खुशखबर राज्यात ५ दिवस पावसाचा अंदाज राज्यात माॅन्सूनसाठी दाखल होण्याची वेध Monsoon Rain 2024

Pune News : माॅन्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. माॅन्सून  माॅन्सूनची प्रगती सुरुच आहे. माॅन्सूनने आज कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणाच्या काही भागात चाल केली. तर माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान असून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये माॅन्सून राज्यात दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.”

Monsoon Rain माॅन्सूनने आज कर्नाटक, रायलसिमा, किनारी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आणखी काही भागात प्रगती केली. तसेच अरबी समुद्राचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून दाखल झाला. माॅन्सूनची सिमा आज कर्नाटकातील होन्नावर, बल्लारी, आंध्र प्रदेशातील कुरनूल, तलंगणातील नरसापूर आणि पश्चिम बंगालमधील इस्लामपूर या भागात होती. 

👉आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

“माॅन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे माॅन्सून पुढील ४ ते ५ दिवसांमध्ये देशाच्या आणखी काही भागात वाटचाल करू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला. माॅन्सून दक्षिण महाराष्ट्र, गोव्यात दाखल होऊ शकतो.

तर कर्नाटक, रायलसिमा, आंध्र प्रदेश, तेलंगणाचा उर्वरित भाग, छत्तीसगड आणि ओडिशाचा आणखी काही भाग, तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात माॅन्सून पुढच्या ४ ते ५ दिवसांमध्ये दाखल होऊ शकतो, अशा अंदाज हवामान विभागाने

दिला.”

Leave a Comment