IMD Rain Alart | पुढील दोन दिवसांत या भागात केला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट..

IMD Rain Alart | महाराष्ट्रातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.

मध्य महाराष्ट्रात कोकणासह काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे; विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे;  

आणि मराठवाड्यात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. ही माहिती हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवर दिली असून, काही कोकण,

मध्य महाराष्ट्र, जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आता होसाळीकर यांनी 30 जून रोजी दुपारी ही माहिती दिली.

आजचा काय आहे हवामान अंदाज पाहा येथे..

रायगड, पुणे, पालघर, रत्नागिरी आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये 30 जूनच्या तीव्र पावसाच्या अंदाजानुसार ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव आणि संपूर्ण विदर्भात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला असून,

मुसळधार ते मध्यम पावसाची शक्यता आहे. d 1 जुलै रोजी सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.

संपूर्ण विदर्भ तसेच पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर मराठवाड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.IMD Rain Alart

येथे पाहा आजचा हवामान अंदाज…

Leave a Comment